गोंदिया जिल्हात 8 ते 12 चे शाळा पुन्हा गजबजल्या, विद्यार्थी पालक उत्साही

गोंदिया 01: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाकडून राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शाळा सुरू करण्यासंबधाने अनेक संघटना व पालकांकडून वाढत असलेले दबाव व विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेता शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक जिल्हा प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार सोपविण्यात आले. जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याने आता पुन्हा 1 फेब्रुवारीपासून इयत्ता 8 ते 12 चे वर्ग सुरु झाले.

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला होता. दरम्यान, 20 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली असून शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक जिल्हा प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार सोपविले. मात्र या कालावधीत जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने ‘वेट अन् वॉच’ची भूमिका घेत बरे होणार्‍या रुग्णांची संख्या लक्षात घेत 1 फेब्रुवारी सर्वच व्यवस्थापन व माध्यमांच्या इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजपासून पुन्हा शाळा गजबजल्या आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share