आज सुरु होणार आरटीई प्रवेश आता 16 फेब्रुवारी पासून

गोंदिया 01: आरटीई अंतर्गत 2022-23 या सत्राकरिता जिल्ह्यातील नामांकित शाळेत पात्र लाभार्थ्यांच्या प्रवेशाची आभासी प्रक्रिया 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार होती. परंतु काही तांत्रिक कारणामुळे ही प्रवेश प्रक्रिया 16 फेब्रुवारी पासून सुरु होणार असल्याचे शासनाने पत्रक काढले आहे.

मागील वेळापत्रकानुसार 1 ते 28 फेब्रुवारीदरम्यान अर्ज स्विकारले जाणार होते 8 व 9 मार्च रोजी ड्रा काढला जाणार होता. 10 ते 31 मार्च दरम्यान लॉटरीद्वारे प्रवेश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना निर्धारित वेळेत शाळेत कागदपत्रांची तपासणी करुन अस्थायी प्रवेश निश्चित करायचा होता. 1 ते 7 एप्रिल दरम्यान पहिल्या फेरीत प्रतिक्षा सुचीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून 11 ते 19 एप्रिल दरम्यान दुसरी फेरी, 25 ते 29 एप्रिल तिसरी व 2 ते 9 मे दरम्यान चौथी फेरीत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share