Breaking: ५० किलो गांजा जप्त
गोंदिया 31: पोलीस अधीक्षक गोंदिया विश्व पानसरे यांचे आदेशान्वयेत सर्व अवैध धंदे, जुगार, एन. डी. पी. एस. कारवाई आदेशीत केल्याने, स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अवैध धंदे करणा-या लोकांवर धाडी टाकण्यासाठी खासगी शासकिय, वाहनाने पोस्टे आमगाव, सालेकसा व रावणवाडी परिसरात पेट्रोलींग करताना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एक हिरवी रंगाची सेन्ट्रो कार MH 12-DY-1921 या क्रमांकाचे वाहन रायपुर यरुन आमगांव मार्गे गांजा अमली पदार्थाची वाहतुक करून विक्री करीता गोंदियाला येत आहे, सदरचे वाहन आमगांव वरुन कामठाकडे निघाले, अशा मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरुन कामठा गावात बस स्टॉप चौक येथे स्टापसह नाकाबंदी केली असता , २०.१० वा. नमुद वर्णनाची एक सेन्ट्रो गाडी आमगाव मार्गाने येतांना दिसल्याने स्टापच्या मदतीने वाहनाचे चालकास इसारा करून वाहन थांबविले असता सदर वाहनामध्ये चार प्लास्टीक बोरी दिसून आले.
वाहन चालकास बोरी मध्ये काय आहे असे विचारले असता, वाहन चालक वास्मीक पुंडलीक लांजेवार वय २४ वर्ष निलज ( गोंड उमरी ) ता. साकोली, जिल्हा भंडारा यांनी चारही प्लॉटीक बोरीमध्ये गांजा असल्याचे सांगीतल्याने पंचासमक्ष चारही पॉकिट बोरी उघडून पाहणी केली असता, त्यामध्ये हिरवट काळसर झाडपत्तीसारखा बिज असलेला उग्र वास येणारा ओलसर अमली पदार्थ दिसून आला तो पदार्थ गांजा असल्याचे पंचानी ओळखल्याने वाहन चालक सोबत असलेली नामे अनिता बन्सोडे ४५ वर्ष गौतमनगर गोंदिया दोन्ही आरोपीतांवर एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५ कलम ८.२०.२९ प्रमाणे फिर्यादी पोउपनि तेजेंद्र मेश्राम नेमणूक स्था .गु.शा. गोंदिया यांचे रिपार्टवरून पो.स्टे. रावणवाडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, यांचे मार्गदर्शनात बबन आव्हाड पोलीस निरीक्षक स्था.शा. सपोनि, राहूल पाटील, पोउपनि, तेजेंद्र मेश्राम, पोउपनि जीवन पाटील, पोउपनि, संतोष यादव, पोउपनि मनीन उघडे, सफो गोपाल कापगते/ ३९ पोहवा. राजेंद्र मिश्रा / ९१९ पोहा अर्जुन कावळे/ ४९, पोहवा भुवनलाल देशमुख/१२६६, पो.ना. तुळशीदास लूटे/१२३९, पोना. महेश मेहर / ९५, पशि विजय मानकर / २०९५, पशि, संतोष केदार/२०८६, मोपोशि सुजाता गेडाम / २३०५ सदरची कार्यवाही यांनी केली आहे.