देवरी नगरपंचायतमध्ये गटनेते म्हणून नगरसेवक सरबजीतसिंग भाटिया यांची निवड
देवरी 31: नगरपंचायत देवरीच्या निवडणूका नुकतेच पार पडले असून नगराध्यक्ष हे अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारण गटात गेले आहे. नगराध्यक्ष पदासाठी आरक्षित प्रभागातील उमेदवार आपली प्राणप्रतिष्ठा पनास लावल्याचे जोरदार चर्चा आहेत.
दरम्यान काँग्रेस पक्षातर्फे मा. जिल्ह्याधिकारी गोंदिया नयना गुंडे यांना देवरी नगरपंचायत मध्ये गटनेते म्हणून नगरसेवक सरबजीतसिंग भाटिया यांची निवड करण्याचे निवेदन देण्यात आले होते. त्यावर शिक्का मोर्तब झाला असून नगरसेवक सरबजीतसिंग भाटिया यांची गटनेते म्हणून निवड झालेले आहे. त्याप्रसंगी मा. जिल्हाधीकारी गोंदिया यांच्या समक्ष नगरसेवक सरबजीतसिंग (शैकी )भाटिया, नगरसेवक मोहन डोंगरे,नगरसेवक नितीन मेश्राम व नगरसेविका सुनीता शाहू उपस्थित होते.
नगरसेवक सरबजीतसिंग भाटिया यांची सर्वानुमते गटनेते म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांनी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या सह पक्षांचे निष्ठावान पदाधिकारी यांचे आभार मानले. यावेळी कार्यकर्ते तसेच मित्र परिवाराने नवनिर्वाचित गटनेते यांचे अभिनंदन केले आहे.