सावधान! 27 दिवसात 19 जणांचा अपघातात मृत्यू तर 6 जणांची आत्महत्या
◾️जानेवारी ठरली ‘जान लेवा’, महामार्गावर विद्यार्थी असुरक्षित
गोंदिया 31: दोन वर्षापासून कोरोना महामारीचे संकट ओढावले असतांना सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांची कोरोनाने मृत्यू झाली मात्र यापेक्षा दैनंदिन घडामोडीत घडणार्या घटनांमध्येच मृत्यूदर अधिक असल्याची बाब नववर्षाच्या जानेवारी महिन्याच्या अवघ्या 27 दिवसात समोर आली आहे. नववर्षाच्या 27 दिवसांमध्ये जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसात आहे. यामध्ये 19 जणांचा रस्ता अपघातात तर 6 जणांची आत्महत्या केली आहे. यामुळे 2022 ची जानेवारी जान लेवा ठरलेली आहे मात्र खरे!
कोरोना महामारीच्या नावाखाली भितीचे वातावरण निर्माण केले जात आहे. पहिल्या व दुसर्या लाटेत जणू मृत्यूची श्रृंखंलाच सुरू झाली असे दर्शविण्यात आले. परंतु या आजारापेक्षा दैनिक घडामोडीत घडणार्या घटनांमध्ये जिल्ह्याचा मृत्यूदर अधिक असल्याची बाब नववर्षाच्या जानेवारी महिन्यातील अवघ्या 27 दिवसात समोर आली आहे. 2022 या नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या 27 दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये 31 जणांचा विविध घटनांत मृत्यू झाल्यांची नोंद जिल्ह्याच्या पोलिस ठाण्यांमध्ये आहे. यामध्ये 19 जणांचा मृत्यू रस्ता अपघातात तर 6 जणांची आत्महत्या आहे. त्याच बरोबर 1 इसमाची हत्या, एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू तर 4 जणांचा उपचार दरम्यान किंबहुना उपचापूर्वी रुग्णालयात मृत्यू झाल्याची नोंद आहे. असे एकंदरीत 27 दिवसात प्रत्येकी 1 पेक्षा जास्त जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे कोरोना संसगार्मुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनापेक्षा दैनिक घडामोडीतून होत असलेली प्राणहाणी थांबविण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावर पाऊल उचलण्याची गरज आहे.
1 जानेवारीला आमगाव, शेडेपार व सौंदड येथे रस्ता अपघातात 2 मृत्यू, 7 जानेवारीला गोंदिया, मुल्ला व देवरी येथे 2 जणांचा मृत्यू, 8 जानेवारी रोजी गंगाझरी येथे महिलेचा मृत्यू, 10 जानेवारीला म्हैसुली येथे रस्ता अपघातात युवकाचा मृत्यू, 13 जानेवारीला पळसगाव-राका, इटखेडा व कोरणी येथे रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू, 15 जानेवारीला तिरोडात एका जणांचा मृत्यू , 16 जानेवारीला चुंबली येथे नाव बुडल्याने एकाचा मृत्यू, 18 जानेवारीला तेढवा-रावणवाडी, जेठभावडा, सावली व तिरोडा येथे रस्ता अपघातात चौघांचा मृत्यू, 20 जानेवारीला ढाकणी येथे रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू, 23 जानेवारीला सहारवानी येथे तलावात बुडून महिलेचा मृत्यू, विविध कारणांनी आत्महत्या केली आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या 7 दिवसांमध्ये 6 जणांची विविध कारणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या घटनांमध्ये कुडवा, कोरणी, बोंडगावदेवी, कारंजा, बरबसपुरा, चिचोली येथील समावेश आहे.