“संघर्ष केल्याशिवाय कुणालाही यश मिळत नाही.”

■ देवरी येथे निशुल्क कॅरिअर मार्गदर्शन व ५०० विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन

देवरी : आपल्या क्षेत्रात शासकीय कार्यालयात जे अधिकारी असतात ते पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातूनच येतात. तेच हुशार असतात की, असे नाही आपल्या भागातही हुशार विद्यार्थी आहेत. त्यांनाही उच्चशिक्षणाची सोय उपलब्ध झाल्यास ते ही मोठे अधिकारी होऊ शकतात. ते ही आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करुण य क्षेत्राचा नाव लौकिक करू शकतात. या करिता मी आपल्या विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगांव व सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम भागात राहणारे गोरगरीब लोकांचे हुशार मुले ज्यांच्या मनात उच्चशिक्षण घेण्याची जिद्द आहे. अशा १२ वी विज्ञान विभागातील ५०० विद्यार्थ्यांकरिता जे.ई.ई.(JEE), नीट(NEET), एम.एच.टी-सी.ई.टी. (MHT-CET) चे प्रशिक्षण आधार फाउंडेशन नागपुरच्या वतीने तिन्ही तालुक्यातील इच्छुक विद्यार्थ्यांना दोन महिन्यात देण्यात येणार आहे. नंतर त्यांना नागपुरच्या आधार फाउंडेशन कोचिंग क्लास मध्ये कोचिंग देण्यात येणार आहे. या ठिकाणी राहण्याची व जेवनाची सोय माझ्याकड़ून करण्यात आली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांमध्ये मी उच्चशिक्षण घेवून मोठा अधिकारी बनण्याची जिद्द असेल त्यांनी या संधिचे सोने करुण घ्यावे. कारण मानवी जीवनात संघर्ष केल्याशिवाय कुणालाही यश मिळत नाही. असे प्रतिपादन आमगांव-देवरी विधानसभेचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
ते देवरी येथे आधार फाउंडेशन नागपुर व आमदार कोरोटे यांच्या मार्फत सीताराम मंगल कार्यालयात आयोजित निशुल्क कॅरिअर मार्गदर्शन शिबिर व ५०० विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांनी बोलत होते.
या प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम बाबा कटरे यांच्या हस्ते आणि आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रसंगी मंचकावर नवनिर्वाचित जि.प.सदस्य राधिका धरमगुळे, देवरीचे नगरसेवक मोहन डोंगरे, सरबजीतसिंग भाटिया(शैंकी), नितिन मेश्राम, नगरसेविका सुनीता शाहू, माजी उपसरपंच परमजीतसिंग भाटिया, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगड़िया, अड़. प्रशांत संगिड़वार, आमगावचे तालुकाध्यक्ष संतोष बहेकार, सालेकसाचे तालुकाध्यक्ष वासुदेव चूटे, सामाजिक कार्यकर्ता सीमाताई कोरोटे, कैलाश अग्रवाल, निर्दोष साखरे यांच्या सह देवरी, आमगांव-आमगाव व सालेकसा तालुक्यातील ५०० विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी अड. संगिड़वार, बाबा कटरे, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश मलीये, सचिव मुकेश चौबे व देवरी येथील प्रा.सुनंदा भूरे यांनीही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाबाबद कशाप्रकारे तैयारी करावी या बाबद मार्गदर्शन केले.
दरम्यान आमदार कोरोटे यांच्या सहकार्याने आणि आधार फाउंडेशन नागपुर यांच्याकडून तैयार करण्यात आलेले. जे.ई.ई.(JEE), नीट(NEET), एम.एच.टी.-सी.ई.टी.(MHT-CET)च्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करुण ५०० विद्यार्थ्यांना चार पुस्तकाचे एक-एक सेट आमदार कोरोटे व उपस्थित पाहुन्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आधार फाउंडेशनचे दिनेश मलीये यांनी तर संचालन मुकेश चौबे यांनी केले आणि उपस्थितांचे आभार जिल्हा काँग्रेसचे महासहसिव बळीराम कोटवार यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या आयोजनकरिता दीपक उर्फ राजा कोरोटे, शकील कुरैशी, कुलदीप गुप्ता, अविनाश टेम्भरे, प्रशांत कोटांगले, अमित तरजुले, सचिन मेडे, नरेश राऊत, रोशन भाटिया, कलीराम किरसान, उमेश अरकरा, युवराज मडावी, छायाताई मडावी, मीनाबाई राऊत, ताराबाई टेम्भूरकर,उज्वलाताई कोचे,निर्मलाताई मडावी, रिनाताई बावनथड़े, अनवंताताई आचले, कमलेश पालीवाल यांच्या सह काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share