आमदार कोरोटे यांच्या प्रयत्नामुळे देवरी तालुक्यात रोजगार हमीच्या कामांना मंजूरी

■ शेरपार, मासुलकसा व मंगेझरी येथील कामांचे आमदार कोरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन

देवरी : आदिवासी अतिदुर्गम व नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील गरीब व गरजू लोकांच्या हाताला रोजगार उपलब्ध नसल्याने ते रोजगाराच्या शोधात मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत. या गंभीर विषयाला धरुन आमदार सहषराम कोरोटे यांनी देवरी येथील तहसील कार्यालयात शासकीय यंत्रनेची रोजगार हमी योजनेच्या संदर्भात शुक्रवार(ता.२१ जानेवारी) रोजी आढावा बैठक घेतली. या बैठकीत आमदार कोरोटे यांनी तालुक्यातील गरीब लोकांकरिता मोठ्या प्रमाणावर रोजगार हमी योजनेच्या कामाचे आराखडा तैयार करुण सर्व कामे त्वरित सुरु करण्याचे सूचना दिल्या आणि स्वतः या कामाबाबद शासनस्तरावर पाठपुरावा व विशेष प्रयत्न करुण मोठ्या प्रमाणावर रोजगार हमीच्या कामांना मंजूरी मिळवून दिली. या अनुसंघाने मंगळवार(ता.२५ जानेवारी) रोजी तालुक्यातील शेरपार, मासुलकसा व मंगेझरी या ठिकाणी नाला सरळीकरण व तलाव खोलिकरणाच्या कामाचे भूमिपूजन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी शेरपार चे सरपंच गुणवंताबाई कवास, उपसरपंच महेनलाल ओटी, ग्रा.पं.सदस्य राजेश मडावी, सीताबाई सलामे, पोलिस पाटिल बंसोड़ यांच्या सह रोजगार हमीच्या कामावर आलेले मजूरवर्ग महिला, पुरुष व युवक बहुसंख्येने उपस्थित होते.

Share