‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’- प्रा.डॉ.सुजित टेटे
◾️महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर व तिरोडा अंतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त व्याख्यानमाला संपन्न
देवरी 28: तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर व व कामगार कल्याण केंद्र तिरोडा अंतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2022 या काळात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा राबविणे बंधनकारक होते. त्यानिमित्त सदर व्याख्यान माला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सुनील पारधी (डाएट गोंदिया), प्रमुख व्याख्याता म्हणून प्राचार्य डॉ. सुजित टेटे , प्रमुख अतिथी म्हणून ताम्रकर जांभुळकर संचालक कामगार कल्याण केंद्र तिरोडा, मराठी विभाग प्रमुख सरिता थोटे मंचावर उपस्थित होते.
मराठी भाषा संवर्धन या विषयावर प्रमुख व्याख्याता म्हणून उपस्थित डॉ. सुजित टेटे यांनी मराठी भाषेची गरिमा कशी जोपासता येणार यावर मार्गदर्शन केले. त्याच बरोबर उपस्थित अतिथींनी आपले मत मांडले. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली मते यावेळी मांडली यामध्ये युसरा भुरा , संस्कृती लांजेवार , प्रणय मोहबे , इशिका उंदीरवाडे यांचा समावेश होता.
दरम्यात या व्याख्यानमाला कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आपली हजेरी लावली होती कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यार्थी गुंजन रोकडे आणि विभांषु गायधने यांनी केले असून आभार प्रदर्शन संकेत बिसेन यानी मानले. शिक्षक नितेश लाडे यांनी विशेष सहकार्य केले.