ग्रामसेवकाने केली 1 कोटी 32 लाख रुपयांची अफरातफर

गोंदिया 24: जिल्हातील एका ग्रामसेवकाने तब्बल 1 कोटी 32 लाख 52 हजार 263 रुपयाची अफरातफर केल्याचा प्रकार उघडकीस आला असून गट विकास अधिकारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ग्रामसेवकाविरुद्ध विविध कलमान्वये पोलीस ठाणे अर्जुनी मोर येथे गुन्हा नोंद केला आहे.

विविध विकास कामांसाठी प्राप्त निधीची अफरातफर केल्याचा प्रकार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत महागाव, ईसापुर, कोरंबी येथे कार्यरत तत्कालीन ग्रामसेवक याने केल्याचे ग्रामपंचायतीच्या दस्तऐवज पातळीवरून निदर्शनास आला आहे. यात तब्बल 1 कोटी 32 लाख 52 हजार 263 रुपये 83 पैशाची अफरातफर झाल्याचे उघडकीस आले आहे.

हा सर्व गैरप्रकार 6 ऑक्टोबर 2020 ते 1 सप्टेंबर 2021 या काळातील आहे. या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामकृष्ण निमजे यांच्या तक्रारीवरून अर्जुनी मोर पोलिस स्टेशन येथे आरोपी ग्रामसेवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी करत आहेत.

Share