गोंदिया: विद्यार्थी, शिक्षक, पालकांचा आनंद भंग

◾️अद्याप शाळा सुरु करण्याचे निर्णय टेबलावरच

प्रहार टाईम्स वृत्तसंकलन गोंदिया 24: ज्या ठिकाणी कोरोनाचे संक्रमण कमी आहे त्या ठि2काणच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना शासनाने स्थानिक जिल्हा प्रशासनावर सोडला होता. जिल्ह्यात पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सोमवारपासून ऐकू येणार असे वाटत असताना स्थानिक प्राधिकरणाने निर्णय कायम ठेवल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालकांचा अपेक्षा भंग झाला आहे.

राज्यासह जिल्ह्यात दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू झाल्या. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागताच खबरदारीचा उपाय म्हणून 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पहाता अनेक स्थरावरून शाळा आवश्यक ती खबरदारी घेत सुरू ठेवण्याची मागणी झाली. या अनुषंगाने शिक्षण विभागाने पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडला. सोमवार 24 जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू होणार असल्याचे विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, जिल्हाधिकारी तथा स्थानिक प्राधिकरणानेे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय न घेतल्याचे जिल्हावासीयांच्या आनंद क्षणभंगूर ठरला. असे असताना काही खासगी शाळांनी मात्र पालकांच्या सामाजिक माध्यमावरील समुहावर सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याचे संदेश पाठविण्यास प्रारंभ केला आहे.

या संदेशासोबतच हमीपत्र सोमवारी विद्यार्थी शाळेत येताना त्यांच्यासोबत पालकाला लिहून पाठवावयाचे आहे. पालकाने विद्यार्थ्याला शाळेत पाठविताना कोणती खबरदारी घ्यावी याच्या सूचनाही दिल्या आहेत. मात्र अधिकृतरित्या कोणताही निर्णय झाला नसल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक संभ्रमावस्थेत आहेत. या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना विचारले असता, जिल्हात वाढती कारोना रुग्णांची संख्या पहाता स्थानिक प्राधिकरणाने शासनाचा निर्णय कायम ळेवल्याचे सांगीतले.

जिल्ह्यात शासकिय, निमशासकीय व खाजगी अशा 1 ते 12 वी पर्यंतच्या 1663 शाळा आहेत. शाळांमध्ये सुमारे 2 लाख 32 हजार 623 विद्यार्थी प्रवेशित आहेत. 10 हजार शिक्षक कार्यरत आहेत. प्रत्यक्ष वर्ग बंद असल्याने काही शाळांनी आभासी शिक्षण सुरू केले आहे.

Share