डिजिटल 7/12 वर 2020-21 चा खसरा चढवून तात्काळ शेतकऱ्यांना लाभ द्या- राजेश चांदेवार
PraharTimes
देवरी 2- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आदिवासी महामंडळाकडून धान्या खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत परंतु धान्य खरेदी केंद्रावर शेतकर्यांना ऑनलाइन डिजिटल सातबारा ची मागणी करण्यात येत असून त्यावर 2020-2021चा खसरा चढविलेला मागत आहे.
परंतु सध्याची परिस्थिति बघता तहसील कार्यालयाकडून शेतकर्यांना डिजिटल सातबारा वर 2020-2021 च खसरा चढविलेला नसल्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांना धान्य खरेदी केंद्रावर धान्य विकता येत नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांची गैरसोय होत आहे .
तालुक्यातील शेतकऱ्यांना तलाठी खसरा चढविण्यासाठी ऑनलाइन इंटरनेट चा बहाणा सांगित असून शेतकऱ्यांना गैरसोयी ला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे तालुक्यातील विविध गावातील शेतकरी आज तहसील कार्यालयात येऊन समस्यांच्या प्रतीक्षेत असताना माजी जि प सदस्य राजेश चांदेवार यांनी तात्काळ खसरा चढवून समस्या मार्गी लावून शेतकऱ्यांना लाभ द्या अशी मागणी तालुका प्रशासनाला केली आहे.