
कन्हान २: कोरोनाविषयी आवश्यक असलेल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जनजागृती होण्यासाठी आणि कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी बोरी येथे नागपूर येथील युवा चेतना मंच तर्फे लॉकडाऊनदरम्यान घेण्यात आलेल्या 'कोरोना जनजागृती' होण्यासाठी चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण करण्यात आले असुन यावेळी प्रमुख अतिथि शरु निमजे, कल्याणी सरोड़े, जया हिवसे, उपस्थित होते.
यावेळी स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना भेटवस्तु देऊन सन्मानित करण्यात आले.








