धानाच्या पुंजण्याला अज्ञात व्यतीने लावली आग

नवल पवार / प्रतिनिधी

देवरी:२
तालुक्यातील सुरतोली गाव क्षेत्रात रात्रीच्या काळोखात अज्ञात व्यक्तीने कटाई करून ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याना आग लावून पसार झाल्याची घटना दुर्दैवी घडली असून सदर घटने मध्ये सुरतोली येथील वंदना उमराव बडगे यांच्या शेतातील अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तलाठी मार्कंड मेंढे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
यावेळी आरोपीचा शोध घेऊन गुन्हा नोंद करण्यात यावा व शासनाने नुकसान भरपाई ची मदत करावी असे महिला शेतकऱ्यांनी यावेळी मागणी केली.

Share