जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज आमंत्रित
गोंदिया 01 : (जिमाका)जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेद्वारे इयत्ता सहावीमध्ये सत्र 2021-22 करीता प्रवेश घेण्याकरीता ऑनलाईन प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी विद्यार्थी हा गोंदिया जिल्ह्यातील सरकारी/निमसरकारी अनुदानित/मान्यताप्राप्त शाळेत किंवा राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थेच्या ‘ब’ वर्गातील शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये शिकत असला पाहिजे. विद्यार्थी हा संपूर्ण शैक्षणिक वर्ष वर्ग पाचवीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील शाळेत अध्ययन केलेला असावा. विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2008 ते 30 एप्रिल 2012 दरम्यान झालेला असावा. प्रवेश अर्ज भरण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही. सदर अर्ज https://navodaya.gov.in/nvs/en/Admission-JNVST/JNVST-class या लिंकवरुन अपलोड करता येतील. यासाठी विद्यार्थ्याचा फोटो (jpg.format), विद्यार्थ्याची व पालकाची सही (स्कॅन केलेली) तसेच विद्यार्थ्याचा फोटो, विद्यार्थ्याची व पालकाची सही असलेले विहीत नमुन्यात सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्राची आवश्यकता लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. परीक्षा 10 एप्रिल 2021 रोजी घेण्यात येईल. विस्तृत माहितीसाठी www.navodaya.gov.in या संकेतस्थळाला भेट दया किंवा जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. अधिक माहितीकरीता परीक्षा प्रमुख जी.एस.केदार (9423424369) किंवा जवाहर नवोदय विद्यालय 07196-228142 यावर संपर्क साधावा. असे नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एम.एस.बलवीर यांनी कळविले आहे.