महाराष्ट्रात ‘येथे’ शाळेला लागले टाळे
मुंबई: राज्यात ओमिक्रॉन आणि कोरोनाचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेने मुंबईतील शाळांच्या schools बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या तब्बल 167 हून अधिक झाली आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आता सतर्क झाले असून पुढच्या पंधरा दिवसांमधील एकूण स्थिती बघूनच शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते.
३१ जानेवारीपर्यंत बंद
राज्यातील आजपासून शाळांमध्येच विद्यार्थ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशात उद्यापासून मुंबई महापालिके अंतर्गत येणाऱ्या पहिले ते आठवी पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत निर्णय घेतला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार आहेत.