… निवडणुका नकोच’, राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जालना 07: ओबीसी राजकीय आरक्षणाच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. भाजपने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आता महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे. अशातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयावर भाष्य केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मी आदर करतो पण ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक स्थगित कराव्यात. ओबीसींना आरक्षण मिळाल्यानंतर निवडणुका घ्याव्यात, यामुळे कुणावर अन्याय होणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीने देखील भाजपच्या सुरात सूर मिसळल्याचं दिसतंय. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होवू नये अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचं राजेश टोपे यांनी यांनी सांगितलं आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगित कराव्यात. त्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घ्यावा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

Share