कोरोना काळात पालक गमावलेल्या १० वी आणि १२ वी परीक्षार्थींचे शुल्क माफ : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यंदाच्या वर्षी इयत्ता 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून घेतले जाणार नाही.
कोरोना महामारीमुउळे आर्थिक आडचणीत आलेल्या या मुलांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Share