DCP राजमाने यांची हवाला व्यापाऱ्यांवर सर्जीकल स्ट्राईक, 84 लाखांची रोकड केली जप्त

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. त्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी नऊ ठिकाणी झाडाझडती घेतली. हवालाची 84 लाख रुपयांची रोकड रात्री जप्त केली. यामुळं हवाला व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी हा सर्जिकल स्ट्राईक केला. नागपुरात सुमारे दोनशे हवाला व्यावसायिक आहेत. हे व्यवसायिक कोट्यवधीच्या रक्कमेची हेराफेरी करतात. यापैकी नऊ ठिकाणी लकडगंज आणि इतवारीत पोलिसांनी धाडी टाकल्या.

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी हा सर्जिकल स्ट्राईक केला. नागपुरात सुमारे दोनशे हवाला व्यावसायिक आहेत. हे व्यवसायिक कोट्यवधीच्या रक्कमेची हेराफेरी करतात. यापैकी नऊ ठिकाणी लकडगंज आणि इतवारीत पोलिसांनी धाडी टाकल्या.

लॉकरमधून जप्त केली रक्कम

धान्य बाजार येथे दुमजली इमारत आहे. त्या इमारतीत 22 खोल्या आहेत. काही खोल्यांमध्ये भुतडा कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात हवालाच्या पैशांचा व्यवहार होतो, अशी माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली होती. येथील कारवाईदरम्यान पोलिसांनी सर्वप्रथम दोन लॉकरची तपासणी केली. त्यात 44 लाख रुपये मिळून आले. त्यानंतर उर्वरित खोल्यांची तपासणी केली असता आणखी दोन लॉकर मिळून आले. या दोन्ही लॉकरमध्ये 40 लाख रुपये सापडले.

लॉकर्समध्ये रोकड मोजण्याचे यंत्र

घटनास्थळी पोलिसांना दोनशेच्यावर लॉकर्स सापडली. हे लॉकर्स कुणाचे आहेत, हे पूर्णपणे समजू शकले नाही. बहुतांश लॉकर्समध्ये लाखोंची रोकड, नोटा मोजण्याचे साहित्य पोलिसांच्या हाती लागले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना याची माहिती देण्यात आली. प्राप्तीकर विभागाचे अधिकारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही स्वतंत्रपणे चौकशी करीत आहेत.

Share