भाजप मध्ये खिंडार, घराणेशाहीला कंटाळून माजी सभापती यांची काँग्रेस मध्ये एंट्री
प्रा.डॉ. सुजित टेटे
देवरी 30: देवरीच्या राजकीय वर्तुळात प्रतिष्ठेचा क्षेत्र म्हणून ओळख असलेला पुराडा जिल्हापरिषद क्षेत्रात अनेक दिग्गजांनी आपले नशीब आजमावले. नवीन आरक्षण सोडत येण्यापूर्वी सर्वसाधारण आरक्षण असल्यामुळे अनुभवी राजकारणी व्यक्तींनी आपली कंबर कसली होती आणि मेहनत देखील घेतली.
नवीन आरक्षणानुसार पुराडा जिल्हा परिषद क्षेत्र महिला राखीव आरक्षणात आले त्यामुळे माजी आमदार संजय पुराम आणि माजी सभापती सविता पुराम यांचे पुराडा हे गृहक्षेत्र असल्याने भाजप चा तिकीट पुन्हा सविता पुराम यांना मिळत असल्याने घराणेशाही राजकारणामुळे नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उदासीनता निर्माण झाल्याचे बघावयास मिळाले.
घराणेशाही राजकारणाला विरोध करण्यासाठी भाजपचे माजी सभापती सुनंदा बहेकार यांना पुराडा जिल्हा परिषद क्षेत्रातिल नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी आपला हक्काचा उमेदवार म्हणून पसंती दाखविली.
नागरिकांची पसंती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह बघून सुनंदा बहेकार यांनी आज (30) ला आमदार सहशराम कोरोटे यांच्या निवासस्थानी अखेर काँग्रेस प्रवेश केला. यावेळी संदीप भाटिया , अविनाश टेभरे , किरण ताई राऊत , सुनंदा ताई बहेकर , कोमेंद्र मेंढे ,प्रदीप परिहार , उर्मिला ताई डोये , भेगराज पटले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुराडा जिल्हा परिषद क्षेत्र समस्यांचे माहेरघर आहे. रस्त्यापासून , पाणी टंचाई , आरोग्याच्या सोयी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यास जनप्रतिनिधीनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचा रोष बघावयास मिळत आहे. आश्वासनाशिवाय कुठलाही काम लोकप्रतिनिधींनी केलेला नाही. कंत्राटदार रस्त्याचे काम अर्ध्यावर सोडून पडतात परंतु निवडून दिलेले प्रतिनिधी समस्या गांभीर्यने घेत नसल्यामुळे या निवडणुकीत मतदार कुणाला कौल देतात ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या आगामी निवडणुकीत रणसंग्राममध्ये चांगलीच रंगात येणार आहे.
पुराडा क्षेत्रात 12 ग्रामपंचायती:
लोहारा , सुरतोली , ओवारा , सावली , डोंगरगाव , देवाटोला , हरदोली , ढिवरिंटोला , शिलापूर , फुक्कीमेटा , पुराडा , मुरपार असे एकूण 12 ग्राम पंचायत आहेत.