आरोग्यमंत्र्यांचे शाळा सुरू करण्याबाबत मोठे वक्तव्य…
मुंबई 29: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठविण्याविषयी पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या अगोदर आरोग्यसेवा संचालनालयाकडून शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर, आता मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही शाळा सुरू करण्यासंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. ओमिक्रॉनसंदर्भात अजून तरी आपल्या राज्याला कुठलिही भीती नाही. कारण, त्याची कुठेही लागण झाल्याचे दिसत नाही, तसेच ज्युनोमिक परिस्थितीचा कुठलाही तसा अहवाल नाही. त्यामुळे, अतिशय चिंता बाळगण्याची गरज नाही. पण, दक्षिण आफ्रिकेती त्याचा रिफ्लेक्ट झालेला प्रभाव लक्षात घेता, काळजी घ्यायला हवी म्हणून मुख्यमंत्र्यांसमेवत आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सची बैठक झाली. त्यानुसार, 1 डिसेंबरला ठरल्याप्रमाणे शाळा सुरू होतील, असेही राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले.