पटेल महाविद्यालयात क्रांतीरत्न चे थाटात प्रकाशन

देवरी : गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल कला-वाणिज्य -विज्ञान महाविद्यालय देवरी येथे सांस्कृतिक विभागातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या ‘क्रांतीरत्न’या एक हजार पानांच्या महाग्रंथाचे थाटात प्रकाशन करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर व कार्यकर्तृत्वावर आधारित या महाग्रंथात अनेक मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट आहेत.पटेल महाविद्यालयातील प्रा.डॉ.वर्षा गंगणे यांचा देखील महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आर्थिक कार्याचा आढावा ‘हा लेख या ग्रंथात समाविष्ट आहे.
२८ नोव्हेंबर या ज्योतीबांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून १३१ ठिकाणी महाग्रंथाचे प्रकाशन होत आहे.याप्रसंगी पटेल महाविद्यालयात देखील प्राचार्य डॉ.अरुण झिंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली क्रांतीरत्न महाग्रँ थाचे प्रकाशन करण्यात आले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण झिंगरे, भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.देवेन्द्र बिसेन ,अर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच लेखिका प्रा.डॉ.वर्षा गंगणे , ग्रंथपाल डॉ.चंद्रमणी गजभिये, इतिहास विभाग प्रमुख डॉ.जयपाल चव्हाण उपस्थित होते.या ग्रँथाचे महाविद्यालयात असणे अत्यंत उपयुक्त व विद्यार्थ्यासाठी महत्वाचे आहे असे गौरवपुर्ण विधान विमोचन सोहळ्यात प्राचार्य डॉ.अरुण झिंगरे यांनी काढले. गंगणे मॅडम चा यात लेख असल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. ग्रंथर्मितीचे प्रेरणास्त्रोत अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया, श्री राजेश खवले साहेब ,संपादिका प्राचार्या डॉ.पुष्पा तायडे मॅडम ,संपादक मंडळ ,निवड समिती, सर्व सहभागी लेखक तसेच लेखिका यांचे डॉ.वर्षा गंगणे यांना धन्यवाद दिले तसेच महाविद्यालयास ग्रंथप्रकाशनाची संधी तसेच अनुमती दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
आजच्या या मोठ्या कार्यात महाविद्यालयाने ग्रंथप्रकाशन सोहळा साजरा करून खारीचा वाटा उचलला आहे त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत या शब्दात सांस्कृतिक विभागाच्या वतीने वर्षा गंगणे यांनी आभार व्यक्त केले. आजचा हा दिवस अजरामर करण्याचा मानस सगळ्यांनीच व्यक्त केला.या ग्रंथाचा इंग्रजी भाषेतून अनुवाद होणार असून तो आपल्या भेटीस लवकरच येणार आहे अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सफलतेसाठी प्रवीण गुरुमार्गी, सुनील खलोदे ,गीता उईके, दत्तू कागदे, समश्री तसेच निवडक विद्यार्थिनी यांनी सहाय्य केले.याप्रसंगी सर्व कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला.

Share