राईटिंग पेंटर संघटनेच्या विविध मागणीला धरून येत्या १५ डिसेंबर रोजी महाअधिवेशन
■ या संदर्भात देवरी तालुक्यातील राईटिंग पेंटर संघटनेच्या कार्यकारणीची निवड
■औरंगाबाद येथे राज्य स्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन
देवरी, ता.२६: महाराष्ट्र राईटिंग पेंटर संघटना देवरी तालुका शाखेच्या वतीने औरंगाबाद येथे येत्या १५ डिसेंबर रोजी आयोजित एक दिवसीय राज्य स्तरीय महाअधिवेशनात सहभाग घेण्याकरिता चर्चा व देवरी तालुक्याची नवीन कार्यकारणीची निवड करण्याकरिता देवरी येथे गुरुवार(ता.२५ नोव्हेम्बर) रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत देवरी तालुक्यातील राईटिंग पेंटर संघटनेची नवीन कार्यकारणीची एकमताने निवड करून राज्यस्तरीय महाअधिवेशनात आपली मागणी व समस्या ठेवण्याकरिता सर्वसंमतीने ठरविण्यात आले.
राईटिंग पेंटर संघटना देवरी तालुका शाखेच्या नवीन कार्यकारणीत अध्यक्ष पदी-नामदेव भेलावे, उपाध्यक्ष पदी-देवानंद डोंगरे, सचिव पदी-मनोज नांदेश्वर(सखी पेंटर), सहसचिव-कुंवरसिंग चंदनमलागर, कोषाध्यक्ष-ईश्वर गेडाम, सहकोषाध्यक्ष- घनश्याम फाफनवाडे, प्रमुख सलाहगार- महानंदा हाडगे, संघटक पदी- कैलाश कुंजाम, तर सदस्य पदी श्रीराम राऊत, ओमराज निकोडे, रजभान बागडे, राजेश भैसारे, नंदूकुमार चंदनमलागर, तुकाराम वाडगुरे, दिलीप बडोले, सचिन साखरे, प्रम्हानंद बागडे, वासुदेव जमदाळ, अशोक मेश्राम, रविंद्र उईके व राजा शकील शेख यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली.
या नवीन कार्यकारणीच्या निवडी नंतर संघटनेचे पदाधिकरी व सदस्यांनी एकमुखाने औरंगाबाद येथे येत्या १५ डिसेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय महाअधिवेशनात सहभाग घेऊन आपल्या मागणी व समस्या मांडण्या विषयी सर्वानुमते ठरविण्यात आले.
संघटनेच्या विविध मागण्यामध्ये प्रशासकीय व शासकीय सर्व अभियानाच्या जाहिरातीचे काम राईटिंग पेंटर संघटनेच्या माध्यमातून करण्यात यावे, जिल्हा परिषद शाळेच्या ड्राईंग शिक्षकांच्या जागी संघटनेच्या सदस्यांना करार तत्त्वावर नेमन्यात यावे, शासनाच्या सर्व जाहिराती मध्ये डिजिटल बॅनर व इस्टीकर वर प्रतिबिंब घालून राईटिंग पेंटिंगच्या माध्यमातून करण्यात यावे, रोजगार हमी योजने अंतर्गत बेरोजगार राईटिंग पेंटरांना काम देने, पेंटिंग कलाकारांना कलाकार मानधन योजने अंतर्गत लाभ देने, वृद पेटिंग कलाकारांना पेन्शन योजने अंतर्गत लाभ देने. अशा मागणीचा समावेश आहे.
या मागणीला धरून येत्या १५ डिसेंबर रोजी औरंगाबाबद येथील रामचंद्र हॉल बीड बायपास रोड येथे राज्यस्तरीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
या सभेचे प्रास्ताविक मनोज नंदेश्वर(सखी पेंटर) यांनी तर संचालन दिलीप बडोले यांनी आणि उपस्थितांचे आभार राजेश भैसारे यांनी मानले.
राज्य स्तरीय या महाअधिवेशनात राईटिंग पेंटर यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहभाग घेण्याचे आवाहन देवरी तालुका राईटिंग पेंटर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.