संविधान दिवसाचं अवचित्त साधून शैक्षणिक साहित्य वाटप

देवरी– महाराष्ट्रातील अति दुर्गम व नक्षल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका येथील नयी रोशनी बहुउद्धेसीय संस्थेचं वेगळा विचार!
देवरी वरून किमान पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या डवकी येथे संविधान दिनाच अवचित्य साधून डवकी येथील जिल्हा परिषद शाळेत नई रोशनी बहुउद्धेसीय संस्था देवरी कडून शैक्षणिक साहित्य चे वाटप करण्यात आले, व संविधान पस्ताविकेचे वाचन करून चिमुकल्या विद्यार्थाना संविधान काय आहे आणि तो कसा करित्या आहे आणि संविधान हा प्रत्येक भारतातील लोकांकरिता सर्वात महान ग्रंथ आहे असे सांगण्यात आले त्याची अंमलबजावणी कधी झाली संविधान निर्मिती कुणी केली किती काळ लागला आणि संविधान कुणी लिहलं हे सुद्धा सांगण्यात आलं आणि भविष्यात संविधान च काय महत्व असेल हे पन सांगण्यात आले
नई रोशनी बहुउद्धेसीय संस्था असे भरपूर उपक्रमातून शालेय विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप करत असते व त्याचा च एक भाग म्हणून सुद्धा जिल्हा परिषद शाळेत शिकत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थाला शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्या मध्ये किमान दीडशे ते दोनशे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले व भविष्यात आपल्या समाजात उच्च शिक्षित कस बनावं याच सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले
वरील कार्यक्रमाप्रसंगी नयी रोशनी संस्थेचे अध्यक्ष मोहित रामटेके,निखिल गेडाम,अजय मरसर्कोल्हे,रोशन उके,प्रेषित चचाने,काजल शहरे,प्राची बागडे,सुरेंद्र पंधरे,ओम मडावी व शाळेचे मुख्याध्यापक लांजेवार सर,तीतराम सर आदी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या बद्धल मुख्याध्यापकांनी नयी रोशनी बहुउद्धेसीय संस्थेचे धन्यवाद मानले

Print Friendly, PDF & Email
Share