सेतू केंद्रातील संगणक ऑपरेटर ७० रुपयांची लाच स्वीकारताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

नागपूर : तहसिल कार्यालय, नागपूर शहर येथील सेतु केंद्रावरील संगणक ऑपरेटर पवन एकनाथ बिनेकर याला ७० रुपये लाच रक्कम स्विकारतांना त्याचे विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरचे पथकाने कारवाई केली आहे .
सविस्तर वृत्त असे को, यातील तक्रारदार हे इतवारी, नागपूर येथील रहिवाशी असुन ते खाजगी व्यवसाय करतात. तक्रारदार यांची मुलगी बारावीमध्ये शिकत असुन तिला स्कॉलरशीप मिळण्याकरीता आवश्यक असणारा उत्पन्नाचा दाखला मिळविण्याकरीता तक्रारदार यानी तहसिल कार्यालय, नागपूर शहर येथे रितसर अर्ज केला. त्यानंतर संगणक ऑपरेटर पवन एकनाथ विनेकर यांनी तक्रारदार यांना शासकीय फी भरल्याच्या पावतीसह उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जाची पोहोच पावती दिली.तक्रारदार यांनी संगणक ऑपरेटर पवन एकनाथ बनेकर यांना उत्पन्नाचा दाखला कधी मिळेल? अशी विचारणा केली असता त्यांनी तक्रारदार यांना उत्पन्नाचा दाखला लवकर पाहिजे असल्यास मला ७० रूपये द्यावे लागतील असे म्हणुन ७० रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना उत्पन्नाचा दाखला मिळविण्याकरीता संगणक ऑपरेटर पवन एकनाथ बिनेकर याना लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे येवुन तकार नोंदविली तक्रारदार यांनी दिलेल्या तकारी प्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथील पोलीस निरीक्षक नितीन बलीगवार यांनी गोपनियरित्या सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये आरोपी पवन एकनाथ बिनेकर संगणक ऑपरेटर, सेतु केंद्र, तहसील कार्यालय, नागपूर शहर यांनी तक्रारदार यांना उत्पन्नाचा दाखल लवकर देण्याकरीता ७० रूपये लाच रक्कमेची मागणी करून लाच रक्कम आज सेतु केंद्र, तहसील कार्यालय, नागपूर शहरचे आवारात स्वतः स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरूध्द पो.स्टे. सदर, जि. नागपूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, लाप्रवि नागपूर, मिलींद तोतरे, अपर पोलीस अधिक्षक, लाप्रवि नागपूर, याचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन बलीगवार, पो हवा अशोक बैस, सारंग बालपांडे, मनापोशि कांचन गुलबासे, चानापोशि शारौक शेख सर्व लाप्रवि, नागपूर यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share