मनोहरभाई पटेल कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयात महिला पोलिसांची सदिच्छा भेट

देवरी 23: गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा सं चालीत मनोहरभाई पटेल कला- वाणिज्य- विज्ञान महाविद्यालय देवरी येथे स्थानिक महिला पोलीस कर्मचारी एम.एम.साठवणे सेवा मडावी यांनी सदिच्छा भेट दिली.मुली तसेच महिला कर्मचाऱ्यांना काही त्रास आहे का याचा आढावा घेण्यासाठी त्या आल्या होत्या.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. अरुण झिंगरे यांच्या उपस्थितीत महिला सेल प्रमुख डॉ. वर्षा गंगणे यांनी महाविद्यालयातील महिला सेल व त्याच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली.प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींसाठी विशेष कार्यक्रम घेण्याचे याप्रसंगी ठरविण्यात आले.
याप्रसंगी पोलीस कर्मचारी,महाविद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचारी गीता उईके,वंदना लाखडे उपस्थित होत्या. एका मोठ्या व संवेदनशील प्रश्नावर या छोट्याश्या भेटीतून चर्चा तसेच संवाद रंगात आला. डॉ.वर्षा गंगणे यांनी त्यांना स्त्रीसुरक्षा व महिला सेल अंतर्गत कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्याचे आश्वासन दिले.तसेच देवरी येथील महिलांचे प्रश्न या स्तुत्य भेटीनंतर लवकर सोडविण्याची प्रेरणा मिळेल असे मत व्यक्त केले.प्राचार्यांनी यासाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

Print Friendly, PDF & Email
Share