ब्लॉसम च्या विध्यार्थ्यांना फायर सेफ्टीचे धडे

◾️विद्यार्थ्यांमध्ये अग्नी सुरक्षा जनजागृती काळाची गरज – प्राचार्य डॉ. सुजित टेटे

देवरी 23: तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे अग्नी सुरक्षा , फायर सेफ्टीचे धडे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले. यामध्ये शाळेतील विध्यार्थी आणि शिक्षकांनी अग्निशामक यंत्राची कार्यपद्धती प्रात्यक्षिकासह अनुभवली.

माझे विध्यार्थी माझी जबाबदारी उपक्रमांतर्गत शाळेतील विध्यार्थ्यांना आपात्कालीन परिस्थितीत आगीवर कसे नियंत्रण मिळवता येणार आणि आपल्यासह इतरांना कसे वाचविता येणार याविषयी अग्निशामक यंत्राच्या वापराचे नियम आणि प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. सदर प्रात्यक्षिकामुळे विध्यार्थ्यांना आपात्कालीन परिस्थिती आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार असे मत प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी व्यक्त केले.

आपात्कालीन परिस्थितीत शाळेत आग लागली असता सर्व प्रथम RACE नियमाचे पालन करण्यात यावे. R-रेस्क्यू (सर्वात अगोदर बचाव करणे ), A- अलार्म( आग नियंत्रण कशाला कॉल करणे ) ,C -कंटेन ( आग लागलेल्या खोलीचे दार बंद करणे ), E-एक्सटिंग्स (सिलेंडर नी छोट्या स्वरूपाची आग विझविण्याचे प्रयत्न करणे)
दुसरा नियम म्हणजे अग्निशामक यंत्राचा वापर कशा प्रकारे करणे ?
यामध्ये PASS या नियमाचा वापर केला जातो. P -पुल(अग्निशामक यंत्राची पिन ओढणे) ,A -एम (आग लागलेला ठिकाणाकडे अग्निशामक यंत्र नेणे ) ,S-स्किझ (अग्निशामक यंत्राचा हॅन्डल दाबणे )S- स्वाईप (अग्निशामक यंत्र दुरून आगीच्या दिसेन हलविणे )

सदर नियमाचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना अग्निशामक यंत्राचे वापर आपत्कालीन परिस्थितीत करण्याचे धडे यावेळी देण्यात आले.

सदर उपक्रमात शिक्षक विश्वप्रित निकोडे , राहुल मोहुर्ले , नितेश लाडे हर्षदा चारमोडे, रुपाली उदापूरे यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share