पहिली ते सातवी शाळा सुरू होणार? टास्क फोर्सची संमती

Mumbai: काल (मंगळवारी) रात्री झालेल्या बैठकीत राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत कोरोना टास्क फोर्सकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. शाळा सुरु करण्याबाबत इतर बाबींची पूर्तता राज्य शासनाने केल्यास शाळा सुरु करण्यास काहीच हरकत नसल्याचे कोरोना टास्क फोर्सचे म्हणणे आहे. जेव्हा लहान मुलांसाठी लस उपलब्ध करून दिली जाईल, तेव्हा लहान मुलांचे लसीकरण सुरु होईल. पण त्यापूर्वी शाळा सुरु करण्यास हरकत नसल्याचेही टास्क फोर्समधील डॉक्टरांचे म्हणणे आहे. जरी कोरोना टास्क फोर्सने हिरवा कंदील दिला असला, तरी कॅबिनेट बैठकीत सोबतच मुख्यमंत्र्यांसोबत शाळा सुरु करण्याचा निर्णय बाबत चर्चा केली जाणार आणि त्यानंतर राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत पुढील दहा दिवसांमध्ये सर्वांशी चर्चा करून शिक्षण विभाग निर्णय घेऊ शकतो. शहरी भागांत टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करायच्या किंवा पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करायच्या याबाबत शिक्षण विभागाने आपली तयारी बघून आणि इतर बाबींची पूर्तता बघून निर्णय घ्यावा, असेही टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणामध्ये आल्याचे दिसत असल्यामुळे राज्य सरकारने अनेक गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यानंतर आता मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासन अनुकूल आहे. पण लहान मुलांच्या लसीकरणानंतरच शाळा सुरु कराव्यात असा कोरोना टास्क फोर्सचा आग्रह आहे. मुंबईमध्ये पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याकरिता मुंबई महापालिकेने तयारी दर्शवली आहे. तसे राज्य सरकारलाही कळवण्यात आले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढलीच, तरी महापालिका प्रशासन पूर्ण सक्षम असल्याचे महापालिकेने राज्य सरकारला कळवले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share