गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने लावली हजेरी,खरीप व रब्बी पिकाचे नुकसान
देवरी 22 : गोंदिया जिल्ह्यात 21 नोव्हेंबर नंतरच्या कालावधीत काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.त्यानुसार आज सोमवारला (दि.22)जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने जिल्ह्यात सध्या हरभरा, लाखोळी, जवस ही पिके उगवणीच्या अवस्थेत आहेत.कापणी अवस्थेतील धानाची कापणी हवामान बघूनच करावी. ज्या ठिकाणी खरीप
धानाची काढणी करण्यात आलेली असेल त्यास काढणीनंतर त्वरित सुरक्षीत ठिकाणी ठेवावीत, जेणेकरुन त्यांचे अवेळी पावसापासून नुकसान होणार नाही. तसेच ज्या ठिकाणी खरीप हंगामातील उत्पादित झालेला धान उघड्यावर असेल तर तो पावसाने भिजण्याची शक्यता असल्याने त्याला त्वरित ताडपत्रीचे आच्छादन करण्यात यावे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,गोंदिया यांनी कळविले आहे.