वृत्तसंस्था / मुंबई : राज्य विधीमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याची राज्य सरकार तयारी करत आहे. तसेच हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याचीही शक्यता आहे. आता हे अधिवेशन 7 डिसेंबर ऐवजी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.
परंपरेप्रमाणे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरला होत असते, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतामुळे हे अधिवेशन मुंबईत होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे अधिवेशन नागपूरलाच व्हावे यासाठी भाजप नेते आग्रही आहेत.
उपमुख्यमंत्री अजीत पवार, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेना विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते जयंत पाटील, काँग्रेसचे गट नेते बाळासाहेब थोरात येत्या दोन ते तीन दिवसांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. .
या भेटीत हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यासंदर्भात तसंच ते मुंबईत घेण्याबाबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. .
या आधी पावसाळी अधिवेशनात आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला नागपूर येथे होईल, असे घोषित करण्यात आले होते.








