गुजरातला कामाच्या शोधात गेलेल्या तरुणाची त्याच्या 3 मुलांसह निर्घृण हत्या

◾️भाजपचे माजी आमदार संजय पुराम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी CBI चौकशीसाठी गुजरातचे मुख्यमंत्री यांना निवेदन

◾️भावाच्या आणि 3 पुतण्याच्या हत्येच्या न्यायासाठी आदिवासी तरुणाची अति. पोलीस अधीक्षकांकडे साकडे

देवरी 22: ( प्रा . डॉ. सुजित टेटे ) तालुक्यातील ओवारा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या तोयाटोला गावातील तरुण सुरेंद्र कैलास वल्के (36) आपल्या 2 मुली व 1 मुलासह गुजरात येथील सुरत येथे मजुरीच्या कामाला गेलेले होता. तिथे सुरेंद्र वल्के आणि त्याच्या 2 मुली ग्रेसी वल्के (13), रुक्ष वल्के (6) आणि मुलगा मोक्ष वल्के (3) यांची निर्घृण हत्या करून त्यांना तलावात फेकण्यात आले. तसेच सुरेंद्र चे मृतदेह 5 किमी दूर शेतशिवारात सापडले अशी माहिती मृत सुरेंद्र वल्के यांचे छोटे बंधू मनोज वल्के यांनी प्रसार माध्यमांना दिली.

सविस्तर वृत्त असे कि देवरी तालुक्यातील आदिवासी गावातील सुरेंद्र गुजरात येथील सुरत येथे मजुरीसाठी गेलेला होता. सोबत त्याचे 2 मुली आणि 1 मुलगा असा छोटासा कुटुंब वास्तव्य करीत होता. पैश्याची अडचण आहे म्हणून सुरेंद्र ने आपल्या काकाला घटनेच्या एक दिवसाआधी फोन वर कळविले होते. दुसऱ्या दिवशी त्याचे मृत शरीर सुरतच्या कंबरेज पोलीस स्टे.च्या हद्दीत शेतशिवारात सापडल्याचे संदेश मिळाले. बातमी मिळताच मनोज आपल्या भावाच्या शोधात 16 नोव्ह. ला गुजरातला रवाना झाला आणि 17 नोव्ह. ला पोलीस स्टे ला भेट दिली. त्यावेळी सुरेंद्रच्या मृत शरीराचे उत्तरीय चाचणी झालेली होती असे कळले.

काही तासात 3 मुलांचे मृतदेह तलावात सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आणि ओळख पटविण्यासाठी बोलावण्यात आले त्यामध्ये तिन्ही मृतदेह मनोजच्या पुतण्याची असल्याचे सिद्ध झाले. तिन्हींचे उत्तरीय चाचणी 18 नोव्ह.ला झाली असून त्याचा रिपोर्ट अजूनही मिळालेला नसल्याचे सांगण्यात आले.

भावाच्या आणि पुतण्याच्या अज्ञात हत्तेखोरांना पकडून फाशीची शिक्षा द्यावी, कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली , संपूर्ण हत्याकांडाची CBI चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनोज वल्के यांनी केली आहे.

सदर घटनेमुळे देवरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जास्त असून वल्के कुटुंबावर दुःखाचे डोंगर उभे झाले असून एकाच वेळी 4 लोकांची हत्या झाल्याने संपूर्ण कुटुंब मानसिक त्रासात गेलेले आहे.

सदर घटनेची फिर्याद मनोजयांनी माजी आमदार संजय पुराम यांच्या कडे मांडली असता पुराम यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांना देवरीचे तहसीलदार आणि अति पोलीस अधीक्षक मार्फत निवेदन देऊन हत्याकांडाची CBI चौकशी ची मागणी केली आहे.

यावेळी भाजप चे राजेश चांदेवार , आनंद नळपते , देवकी मरइ , नूतन कोवे , सरिता नेताम , कांता कुंभरे , विजय मडावी आदी उपस्थित होते.

Share