आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा साजरी

देवरी 19 : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय देवरीच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आदिवासी आश्रम शाळा पुराडा येथे थाटात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वेगवेगळ्या जिल्हातील स्पर्धकांनी हजेरी लावून आपल्या नृत्य प्रकारचे सादरीकरण केले.

गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. येथे आदिवासी लोक मोठ्याप्रमाणात वास्तव्याला असून भगवान बिरसामुंडा यांच्या जयंती निमित्त आजादीका अमृतमहोत्सव कार्यक्रमाचे देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनात थाटात आयोजन करण्यात आले होते.

आदिवासीचे लोप पावत असलेल्या विविध लोक नृत्याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.

सदर महोत्सवाच्या उद्दघाटनाच्या प्रसंगी जिल्हा परिषद गोंदिया चे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर , उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या सह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Share