देवरी येथील 2021 च्या समाविष्ट मतदार यादीत घोळ असल्याची शक्यता ?

◾️बोगस मतदार असल्याची शंका?

◾️शिवसेना जिल्हा संघटिका करुणा कुर्वे यांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन

प्रा. डॉ सुजित टेटे

देवरी 19: नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निवडणूक येत्या काही दिवसात येत असून विविध भावी उमेदवारांनी निवडणूकित बाजी मारण्यासाठी वेगळीच शक्कल लावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

15/जानेवारी /2021 रोजी प्रकाशित झालेल्या देवरी येथील समाविष्ट मतदार यादी मध्ये मोठा घोळ असून बोगस मतदारांचा समावेश झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे शिवसेना जिल्हा संघटिका करुणा कुर्वे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी , तहसीलदार , मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.

निवेदनातील मुद्यानुसार इतर गावातील मतदारांचे नाव देवरी येथील वेगवेगळ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आले असून एकाच व्यक्तीला दोन ठिकाणी कसा मतदान करता येणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

विशेष म्हणजे काही मतदार ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केलेला असून त्यांचे नाव देवरी मध्ये वेगवेगळ्या प्रभागात देखील बघावयास मिळत आहे त्यामुळे मतदार यादी वर शिवसेनेने प्रश्न चिन्ह निर्माण केला आहे.

देवरी नगर पंचायत निवडणुकी मध्ये अपेक्षित उमेदवाराला फायदा पोहचवण्यासाठी अपेक्षित प्रभागात नाव यावे म्हणून बहुतांश मतदारांनी जाणीव पूर्वक आपले नाव एका भागातून दुसऱ्या भागात समाविष्ट केल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

देवरी येथील समाविष्ट मतदार यादी मध्ये अंदाजे ५०० च्या वर बोगस मतदारांची भरती झाल्याची शक्यता व्यक्त केली असून देवरी येथील वास्तविक वास्तव करणाऱ्या लोकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करावे व इतरांचे नाव वगळण्यात यावे आणि निर्दोष मतदार यादी 23/11/2021 ला प्रसिद्ध करावे असे निवेदनातून विनंती करण्यात आली आहे.

नगरपंचायत देवरी कडून येत्या 23/11/2021 ला मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून ती सकाळी 11 वाजता उपलब्ध करून द्यावी तसेच आक्षेप व हरकती नोंदविण्याचा कालावधी 23/11/2021 ते 26/11/2021 असून फार कमी कालावधी असल्यामुळे इच्छिकांनी मागणी केल्यास मतदार यादी उपलब्ध करून द्यावी असे निवेदन नमूद केले आहे.

यानिवेदनावर नगरपंचायत प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झालेले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share