देवरी तालुक्यातील २५ वनहक्क दावे लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप

आमदार कोरोटे यांच्या सततच्या प्रयत्नाला व पाठपुराव्याला यश

देवरी १९: आमदार सहषराम कोरोटे यांनी वनहक्क जमिनीचे दावे प्रकरणात गोंदियाचे जिल्हाधिकारी व राज्य शासन दरबारी या प्रकरणाला धरून सतत केलेले प्रयत्न व पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून यात देवरी तालुक्यातील एकूण २५ शेतकऱ्यांना शेत जमिनीचे पट्टे मंजूर झाले. यांना पट्टे वाटप देवरी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सव अंतर्गत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्य पट्टे वाटप कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार(ता. १८ नोव्हेम्बर) रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमात जमिनीचे पट्टे वाटप आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि उपजिल्हाधिकरी तथा देवरीचे उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेखाली व देवरीचे गटविकास अधिकारी चांद्रमणी मोडक यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
या प्रसंगी देवरी तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच वनहक्क जमीन दावे प्रकरणातील जमीन पट्टे लाभार्थी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार अनिल पवार यांनी तर संचालन व उपस्थितांचे आभार सिलारे मॅडम यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share