पोलीस अधीक्षक पानसरे यांनी इंदिरा गांधी यांना केले अभिवादन


गोंदिया:पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या शुभ हस्ते इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी राष्ट्रीय एकात्मता शपथ वाचन करून त्या पाठोपाठ उपस्थित पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी शपथ वाचन केले.

सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस निरीक्षक तथा अति, कार्य, पोलीस उपअधिक्षक (मुख्या) श्रीमती तेजस्विनी कदम, पोलीस निरीक्षक, बबन आव्हाड, प्रमोद घाँगे, महादेव तांदले, दिनेश तायडे तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share