देवरी येथील दिवाणी न्यायालय इमारतीचा रविवारी कोणशिला समारंभ

गोंदिया 19- देवरी येथील दिवाणी व फैजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोणशिला समारंभ रविवार २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा वरीष्ठ प्रशासकीय न्यायाधीश नागपूर खंडपीठ सुनील शुक्रे यांचे हस्ते होणार आहे.
नवीन न्यायालय परिसर, बस स्थानकाजवळ राष्ट्रीय महामार्ग ६ देवरी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोणशिला समारंभ आयोजित केला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायाधीश न्यायिक जिल्हा गोंदिया अविनाश घरोटे, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर खंडपीठाचे न्यायिक सदस्य सेवानिवृत्त न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया शब्बीर अहमद औटी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन दिवाणी न्यायाधीश देवरी एम. डब्ल्यू. ए. एम. जे. शेख व तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍड. पी. एन. संगीडवार यांनी केले आहे. कोविडच्या नियमांचे पालन करून व मास्क लावून कार्यक्रमास उपस्थित रहावे, असेही आयोजकांनी कळविले आहे.

Share