सहायक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

तीस हजाराची लाच घेतल्याचा गुन्हा दाखल
अहमदनगर : लाकूड वाहतुकीला परवानगी देण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना वनविभागाच्या अहमदनगर कार्यालयातील दोघांना पकडण्यात आले आहे. यामध्ये सहायक वनसंरक्षक सुनील रतन पाटील (वय ५७) आणि वन परिक्षेत्राधिकारी सुनील अच्युतराव थेटे (वय ५६) असे पकडण्यात आलेल्या दोघा लाचखोरांचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचे लाकूड वाहून नेणारे वाहन कारवाई करत वन विभागाने पकडले हाेते. ते कारवाई न करता सोडून दिले. यासाठी तक्रारदाराकडून या दाेघांनी ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यातील पहिल्या टप्प्यात ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून ३० हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना पाटील व थेटे यांना नाशिक पथकाने गुरुवारी पकडले.

लाचलुचपत नाशिक परिक्षेत्राचे पाेलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

Share