खाजगी शाळांमधून विद्यार्थ्यांची सरकारी शाळांकडे धाव! : ‘असर’चा सर्व्हे

वृत्तसंस्था / मुंबई : मागील दोन वर्षात खास करून कोरोना काळात खाजगी शाळांकडून विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांकडे धाव घेतल्याचे चित्र आहे. ‘असर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात राज्यात सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण हे साडेनऊ टक्क्यांनी तर देशात 6 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वारंवार पटसंख्या कमी होत असलेल्या सरकारी शाळांचा महत्व वाढायला लागला आहे. मात्र असं नेमकं काय झालंय? विद्यार्थ्यांनी खाजगी शाळांच्या ऐवजी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा विचार केला आहे
कोरोना येण्याआधीचा काळ असा होता, ज्यावेळी सरकारी शाळांची पटसंख्या कमी होऊन अनेक सरकारी शाळा बंद करण्याची वेळ आली होती.

आता याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कोरोना काळात वाढलेली पाहायला मिळत असून 2018 च्या तुलनेत यावर्षी साडे 9 टक्क्यांनी सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढले आहे. या ‘असर’ रिपोर्टमध्ये राज्यातील 990 गावांतील 6 ते 16 या वयोगटातील चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.
खासगी शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 32.5 टक्क्यांवरून 24.4 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. त्यातही मुलांच्या तुलनेने मुलींना शासकीय शाळेत दाखल करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे.

मागील दोन वर्षात सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी –
2018   मुले 57.8%   मुली 63.3 %  एकूण 60.5%
2020   मुले 66.5 %  मुली 69.2%  एकूण 67.8%
2021    मुले 67.1%   मुली 72.8%  एकूण 69.7%

सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची मुख्य कारणे –
– शहरांकडून ग्रामीण भागांत मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर.
– कोरोनामुळे अनेक क्षेत्रांतील अर्थकारणावर परिणाम
– कोरोनाकाळात अनेक कुटुंबांच्या उत्पन्नात घट.
– खासगी शाळांची वाढलेली भरमसाठ फी
– छोट्या खासगी शाळांचे अर्थकारणही ढासळल्याने अनेक शाळा बंद करण्याची आलेली वेळ
– कोरोना काळात सरकारी शाळांची विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत

मुंबईतील महापालिका शाळांमध्ये सुद्धा मुंबईतील इतर खाजगी शाळांमध्ये वाढलेली पाहता सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. खरं तर कोरोना काळात सरकारी शाळांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली. अभ्यास साहित्य, पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न झाले. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळत नव्हतं त्यांच्यासाठी सुद्धा पर्याय उपलब्ध करून दिले खाजगी शाळांना या काळात जमलं नाही ते सरकारी शाळांनी करून दाखवलं आहे.
कोरोना काळात ज्याला आपण ‘आऊट ऑफ द बॉक्स’ जाऊन शिक्षण देण्याचे कार्य म्हणू असा काम सरकारी शाळांनी केले आहे. कठीण काळात लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता यावे, त्यांना कुठल्याही परिस्थितीत शालेय शिक्षण मिळावं, यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत आणि एक प्रकारे सकारात्मक विश्वास पालक आणि विद्यार्थ्यांचा या शाळांनी संपादन केला आहे. त्याचेच हे फळ म्हणावं लागेल मात्र हा विश्वास आता या शाळांना टिकून ठेवावा लागणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share