भाजप तर्फे महाराष्ट्रात इंधनावरील कर कमी करण्याची मागणी
देवरी – केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोलवरील पाच रुपये आणि डिझेलवरील दहा रुपये एक्साईज कर कमी करुन जनतेला दिलासा दिला. त्याचप्रकारे भाजप शाशीत प्रदेशासारखंच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने सुद्धा इंधनावरील कर कमी करुन सर्व नागरिकांना दिलासा देण्याची मागणी देवरी तालुका भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांना स्थानिक तहसीलदार मार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे.
दीपावली आधी पेट्रोल आणि डिझेल उत्पादक कंपन्यांनी इंधनाचा भाव वाढवल्यामुळे भारतातील सुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला शॉक लागून अनेकांचे बजट बदलले होते. तर, अनेकांना महागाईमुळे नको त्या समस्यांना तोंड द्यावे लागले.
यासर्व बिंदूचा विचार करुन केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोलवरील पाच रुपये आणि डिझेलवरील दहा रुपये एक्साईज कर कमी करुन जनतेला दिलासा दिला. याबरोबरच भाजप शाशीत सर्वच प्रदेशातील सुद्धा सरकारने पेट्रोलवरील पाच रुपये आणि डिझेलवरील दहा रुपये व्ह्याटकर कमी करुन जनतेला दिलासा दिला.
त्याचप्रकारे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने सुद्धा इंधनावरील कर कमी करुन जनतेला दिलासा द्यायला पाहिजे होतं. परंतू , काँग्रेस शाशीत प्रदेशातील सरकारने पेट्रोलवरील आणि डिझेलवरील कर कमी न करता तथा कपात न करता फक्त मोदींवर आरोप लावण्याचे खोटारडेपणा अजूनही सुरु असल्याचे बघून भाजप शाशीत प्रदेशातील सरकार सारखेच सुद्धा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने इंधनावरील कर कमी करुन तथा कपात करुन सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी देवरी तालुका भाजपच्या वतीने स्थानिक तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १२ नोव्हेंबरला निवेदन पाठवण्यात आले आहे.
यावेळी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश चांदेवार, तालुकाध्यक्ष अनिल येरणे, माजी गटनेते संतोष तिवारी, महामंत्री प्रवीण दहीकर, ज्येष्ठ कार्यकर्ते बंटी भाटीया, संजय दरवडे, ललन तिवारी, माजी सभापती रितेश अग्रवाल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष इंदरजीतसिंग भाटीया, महामंत्री नितेश वालोदे, युवराज मेश्राम, प्रवीण मेश्राम, दिनेश भेलावे, अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्ष इमरान खान आदी प्रामुख्याने उपस्थित होते.