ग्यारापत्ती जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक : सहाच्या वर नक्षलांच्या खात्मा

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्यातील ग्यारापत्ती कोटगुल जंगल परिसरात आज सकाळी सी ६० जवान आणि नक्षलांच्या चकमक उडाली यात ६ ते १० नक्षल ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली असून पोलीस विभागाने अधिकृत जाहीर करणे टाळले आहे .
सविस्तर वृत्त असे कि आज सकाळी सी – ६० जवान ग्यारापत्ती कोटगुल जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना धबा धरून बसलेले नक्षल पोलिसांच्या दिशेने अंधादून गोळीबार करीत होते त्याला प्रतित्तूर म्हणून सी-जवान देखील गोळीबाराला सुरुवात केली पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलांनी जंगलाकडे पळ काढली नंतर शोध मोहीम राबवित असतांना ६ ते १० नक्षलांची मृतदेह आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली असून पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधले असता चकमक उडाल्याचा बातमीला दुजोरा दिले मात्र नक्षलांच्या खात्म्याचा वृत्ताला अधिकृत दुजोरा दिले नाही.

Print Friendly, PDF & Email
Share