NAS 2021 परीक्षा ब्लॉसम स्कुलमध्ये संपन्न

देवरी 12: तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल ची नॅशनल अचिएव्हमेन्ट सर्वे 2021 अंतर्गत वर्ग 5 वी साठी निवड करण्यात आली होती. शाळेचे प्राचार्य डॉ सुजित टेटे , निरीक्षक रिता चॅटर्जी (दिल्ली पब्लिक स्कुल ) , फिल्ड निरीक्षक हंसराज टेम्भारें यांच्या मार्गदर्शनात सदर परीक्षा पार पडली.

यामध्ये 29 विध्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ सुजित टेटे यांनी शालेय प्रश्नावली भरली , विषय शिक्षक विश्वप्रित निकोडे , राहुल मोहुर्ले , रुपाली उदापूरे यांनी शिक्षक प्रश्नावली भरून सहभाग नोंदविला.
सदर NAS 2021 च्या यशासाठी नामदेव अंबादे , स्वप्नील पंचभाई , सरिता थोटे , हर्षदा चारमोडे , योगिता कोसरकर , तनुजा भेलावे यांच्या सह सर्व शिक्षकांनी सहकार्य केला.

Print Friendly, PDF & Email
Share