प्रकल्प अधिकारी देवरी यांनी आदिवासी भागातील गरजूंना मदत करीत साजरी केली दिवाळी

देवरी 05 :- एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाद्वारे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी आदिवासी आश्रम शाळा आणि वसतिगृह यांचा व्हाट्सउप समूह तयार करून त्या माध्यमातून आदिवासी नक्षल ग्रस्त भागातील अत्यंत गरजू आदिवासी समाजातील आणि इतर नागरिकांना दिवाळीचा सण साजरा करता यावा म्हणून गोंदिया जिल्हातील आदिवासी बांधवाना जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्य भेट देण्यात आले जेणे करून परिवारातील लोकांना दिवाळी साजरी करता यावी.
कोरोना मुळे गेल्या दोन वर्षांपासून आदिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी पुढे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला होता.अनेकांचे कोरोनामुळे कुटूंब पोरके झाले होते केवळ जंगलात पिकविणाऱ्या भाजीपाल्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता अशात विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक समस्या देखील होत्याच अशा परिस्थितीत यंदाची दिवाळी या आदिवासी बांधवांसाठी गोड जावी म्हणून एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग देवरी येथील अधीकारी व कर्मचारी यांनी आदिवासी भागात भेट देऊन या भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच उदर निर्वाह करीता जीवनावश्यक साहित्य देऊन आदिवासी बांधवांची दिवाळी गोळ केली.

Print Friendly, PDF & Email
Share