मौजा ओवारा येथे ‘लोक काय म्हणतील..?’ नाट्य प्रयोग

देवरी 4: तालुक्यातील मौजा “ओवारा ” येथे तारुण्य नाट्य कला मंडळाच्या सौजन्याने खास दिवाळी निमित्त भाऊबीज च्या शुभ पर्वावर रंगवैभव रंगभूमी वडसा निर्मित सहर्ष सादर करित आहे संगीत ‘लोक काय म्हणतील ?’ या नाट्य प्रयोगाचे आयोजन ५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वा. करण्यात आले आहे.

तसेच या नाट्यप्रयोगात दोन रेकॉर्डिंग डांसचे सादरीकरण होणार आहे सदर नाट्य प्रयोग जि प प्राथमिक शाळा ओवारा च्या भव्य पटांगणात बंद शामियान्यात होत आहे
या नाटकाचे उद्घाटन आमदार सहसराम कोरोटे हे करणार आहेत.तर सह उदघाटक म्हणून माजी आमदार संजय पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share