दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटली, थोडक्यात बचावले प्रवासी

दुचाकीला वाचवण्याच्या नादात बस चालकाचा तोल गेला आणि बस कडेला जाऊन उलटली. या बसमध्ये ३० प्रवासी होते. यातील ४ प्रवाशी जखमी झाले असून इतर प्रवासी थोडक्यात वाचले.

गोंदिया 01: प्रवाशांना गोंदियावरुन नागपूर घेऊन जाणारी बस दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात उलटली. या घटनेत ३० प्रवासी थोडक्यात बचावले. ही घटना १ नोव्हेंबरच्या सकाळी ७.२५ वाजता गणखैराजवळ घडली.

बस जोराने धावत असताना रस्त्याने एक मोटारसायकल चालक हलगर्जीपणे वाहन चालवित होता. दरम्यान, रस्ता ओलांडत असताना त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे संतुलन  ढासळले आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.

या बसमध्ये ३० प्रवासी होते. यातील चार प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने प्राणहानी झाली नाही. वृत्त लिहीपर्यंत घटनास्थळावरून प्रवाशांना बाहेर काढणे सुरू होते. उलटलेल्या बसचा क्रमांक एम एच ०७ सी ९१४७ असा आहे. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share