शब्द शंकरपाळी साहित्य समूहाचा पहिला काव्यसंग्रह उत्साहात प्रकाशित.
मुंबई २५:
शब्द शंकरपाळी साहित्य समूहाची स्थापना दिनांक 6 नोव्हेंबर 2020 या दिनी झाली. समूहाचे संस्थापक श्री.भूषण सहदेव तांबे यांनी या समूहाची स्थापना केली आणि त्यांनी त्यांचा स्वनिर्मित काव्यप्रकार समूहामध्ये प्रकाशित केला इतकेच नव्हे तर समूहातील सर्व नवोदित तसेच ज्येष्ठ साहित्यिकांनी त्यास भरपूर प्रेम आणि विश्वास दर्शवून, तसेच सहकार्य करून आपल्या शब्द शंकरपाळी स्वरचित रचना समूहात दैनंदिन सादर केल्यात. जेव्हा जेव्हा समूह प्रशासकांना जमले तेव्हा तेव्हा त्यांनी सर्वांस अभिप्राय देण्याचा प्रयत्न केला. कधी कधी हा अभिप्राय रचनेची स्तुती करण्यासाठी होता, तर कधी कधी हा अभिप्राय रचना दुरुस्ती करण्यासाठी होता पण सर्व साहित्यिकांचा सहभाग पाहून आणि त्यांनी दिलेल्या भरघोस प्रतिसाद या सर्व गोष्टींमुळे या समूहाची उंची मराठी साहित्यिक क्षेत्रात उदयास आली.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रोशन रमेश भोईर यांनी फार अप्रतिम केले. या मंगलमय कार्यक्रमाच्या खास पाहुण्या म्हणून सौ. मानिनी मनिष महाजन यांना आमंत्रित केले होते आणि त्यांच्या शुभहस्ते काव्यसंग्रहाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या सौ. मानिनी मनिष महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि शेवटी सर्व साहित्यिक मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
या संग्रहातील निवडक रचनांपैकी काही खास रचना सर्वांच्याच लक्षात राहतील असे मान्यवर साहित्यिक म्हणजे शिवाजी जाधव, आरती सशीतल, शोभा वागळे, अनिल डांगे, मीरा खंडांगळे, बी. सोनवणे, दर्शन जोशी, सुलभा गणगे, अनु देसाई, शलाका कोठावदे, जयेश मोरे, क्रांती पाटणकर, जयश्री नांदे, मृगनयना भजगवरे, स्मिता ढोनसळे, साहेबराव ठाकरे, दीपा वणकुद्रे, सानिका कदम, रोहिणी पराडकर, स्वाती काळे, श्रीगणेश शेंडे, अनिता इंगळे, मनोज जाधव, पद्माकर भावे इत्यादी होते.