महाराष्ट्रात नो एंट्री राज्य सरकारचा मोठा निर्णय

याचार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीशिवाय महाराष्ट्रात नो एंट्री

मुंबई २५:
देशातील वाढत्या कोरोना संक्रमितांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून येणाऱ्या नागरिकांना कोरोना टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच, फक्त निगेटिव्ह असलेल्या नागरिकांनाच महाराष्ट्रात येता येईल.

राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ‘दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून येणाऱ्या हवाई प्रवाशांना महाराष्ट्रातील विमानतळावर उतरल्यानंतर RT-PCR रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे. नियोजित प्रवासाच्या 72 तास आधी ही चाचणी करावी लागेल,’ असे महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या नियमावलीत म्हटले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share