खासदार प्रफुल्ल पटेल यांचा देवरी तालुक्यात जनसंपर्क दौरा

देवरी २५: आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीकरणाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जिल्ह्यात पक्ष वाढीची कमान स्वत: स्विकारून झंझावाती दौरा कार्यक्रम सुरु केला आहे.

खासदार प्रफुल्ल पटेल यांचा देवरी तालुक्यात कार्यकर्ता जनसंपर्क दौरा २९ तारखेला असुन भर्रेगाव येथे दुपारी ११:३० वाजता, पिंडकेपार (गोटाबोडी) येथे दुपारी १:०० वाजता तर सावली येथे दुपारी २:०० वाजता कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर व आमगाव विधानसभेचे शिलेदार व सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रमेश ताराम हे उपस्थित राहणार आहेत.

खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नातून धानाला मिळालेला २५०० रूपये भाव मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्नापासुन येथिल शेतकरी त्यांचा आभारी आहे व ग्रामिण भागात राहणाऱ्या त्यांच्या पासुन दुरावलेल्या कार्यकर्त्याना पुन्हा जोडता येईल. त्यामुळे देवरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा  जि.प व प.स च्या निवडणुकीतअव्वल असेल

अशी भावना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष सि.के बिसेन यांनी केले आहे.

एकंदर खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दौरा हा देवरी तालुक्याला नवसंजिवनी देणारा ठरेल त्यामुळे कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागल्याचे तालुक्यात चित्र दिसुन येते.

Share