महानुभाव पंथीय आँनलाईन उपवर – वधू परिचय मेळावा चे २२ नोव्हे.ला मा.साजनकुमार शेंन्डे (चंद्रपुर RTO साहेब) यांचे हस्ते उद्घाटनीय सोहळा संपन्न

सुदर्शन एम. लांडेकर

उपसंपादक प्रहारtimes


सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा.)व परीसर या संस्थे द्वारा दि.२२/११/२० रोज रविवारला दु ०१ वा. मा.साजनजी शेंन्डे साहेब ( प्रादेशिक परीवहन अधिकारी ,RTO चंद्रपुर) यांच्या हस्ते आँनलाईन महानुभाव पंथिय उपवर वधू परीचय मेळाव्याचे दिपप्रज्वलन करून उद्घाटन झाले….
महानुभाव पंथीय उपवर – वधू यांना विवाह जूळण्यास येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन सर्व समाजातील सकळ महानुभाव पंथीय उपवर- वधूंचा एकाच ठिकाणी परिचय व्हावा या उद्देशाने “महानुभाव पंथीय उप वर – वधूं परिचय तथा मनोमिलन” मेळाव्याची सुरूवात रविवार दि.२२ नोव्हेंबर २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने झाली.. या परीचय मेळाव्यामध्ये आता पर्यत जवळपास ५०० च्या वर उपवर- वधूनी आँनलाँईन नोंदनी केली होती व अजूनही नोंदन्या सुरूच आहेत.उपवर वधूंचा प्रचंड प्रतिसाद बघता दि.२२ तारखेला सदर कार्यक्रमामध्ये वेळेच्या बंधनामुळे नोंदनी झालेल्या पैकी उपस्थित विविध क्षेञातील फक्त ८० उपवर वधूचा परीचय सोहळा खेळी मेळीने व आंनदाने पार पडला…
या प्रसांगाच्या अवचित्ताने कार्यक्रमाचे उद्घाटक तथा मार्गदर्शक आदरणीय मा.साजनकुमारजी शेंन्डे सर (RTO साहेब चंद्रपुर) यांनी उपवर वधूंना मार्गदर्शन करतांना आजच्या गतीशिल,वेळेचा अभाव व धकाधकीचे जिवन जगत असतांना अनेक समस्यां व अडचणीचा सामना करावा लागतो. त्यातच योग्य व अनुरूप जोडीदाराचा शोध घेणे सोपे नसल्यामुळे लग्न जुळणे कठिण झाले असतांना या सामाजिक समस्येवर मात करण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी बा.व परीसर संस्थेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतूक करून उपस्थितांना विविध प्रकारच व अनमोल मार्गदर्शन करतांना ते म्हणाले..
वैवाहीक जिवनाचा मुळ उद्देश फक्त मौज मजा करण्यासाठी नसुन पुरूषार्थ साधन्यासाठी आहे .बहीरंग दिशेला भटकत असलेल्या मनाला एका ठिकाणी केंद्रित करून आपल्या जिवनाला योग्य दिशा देणे हे आहे…एवढेच नाही तर या दोन जिवाच्या मिलनाने अणेक नातेसंबध येकञ येऊन अणेकांच मनोमिलन याद्वारे साधण्याच एकमेव पविञ साधन आहे..
या निमित्ताने सरांनी हितगुज साधतांना स्वतःचा २००८ मध्ये आयोजित अशाच उपवर वधु परीचय मेळाव्यामध्ये त्यांचाही विवाह जुळून आला व वैवाहीक जिवन जगण्याचा आनंद ते उपभोगतात…म्हणूनच अशाप्रकारच्या परीचय मेळाव्याची सर्वच समाजाला गरज आहे..
या मेळाव्याला संपुर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर मध्यप्रदेश ,छत्तीसगढ मधीलही युवक युवतींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला..
अजुनही अणेकांचा परीचय शिल्लक असल्याने पुढील अणेक रविवारला टप्याटप्याने हा कार्यक्रम आँनलाईन पध्दतीने होणार असुन या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सर्वज्ञ विचारमंच SSCSVM या युट्युब चँनलवर होणार असल्याची घोषना आयोजक संस्थेने केली.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन मा. अँडो.संतोष रामटेके(सचिव-सर्वज्ञ विचारमंच) यांनी केले.तर आभार-मा.डाँ.दिपकजी गणविर सर (वरिष्ठ सल्लागार ,आरोग्य व कुंटूब कल्याण मंञालय नवी दिल्ली ) यांनी आभार व्यक्त केले.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी बा.व परीसर ही संस्था मागील ०८ वर्षापासुन सामाजिक ,धार्मिक ,सांस्कृतिक,बौद्धिक तसेच विदर्भ स्तरीय स्वच्छता अभियान ईत्यादी अणेक उपक्रम प्रत्यक्ष कृतीशिल रित्या निरंतरआयोजित करीत असून यावर्षी कोरोणा महामारीच्या पार्श्वभुमीवर आँनलाँईन झुम मिटींगद्वारा बौद्धिक व्याख्यानमाला,स्वच्छता अभियान तथा जनजागृती संदेश उपक्रम, विविध आँनलाईन स्पर्धा , अशा अणेक उपक्रमांचे आयोजन करून यशस्वीपणे पार पाडण्यास प्रयत्नशील आहे…
या परीचय मेळाव्याचे दुसरे सञ दि.२९/११/२० रोज रविवार आहे. याचा लाभ सर्वानी अवश्य घ्यावा *मुख्य आयोजक*

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी बा.व परीसर

?दंडवत प्रणाम?

Share