नक्षलांनी पेरून ठेवलेला डम्प शोधण्यास गोंदिया राजनांदगाव पोलिसांना यश

कहुआभरा राजनांदगाव जंगल परिसरात गोंदिया व राजनांदगाव पोलिसांची संयुक्त नक्षल विरोधी अभियान

डॉ सुजित टेटे


गोंदिया 24: कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी यांना बतमीदारांकडून विश्वसनीय माहिती प्राप्त झाली होती. पोलीस स्टेशन गातापार राजनांदगाव अंतर्गत मौजा कहुआभरा जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या व पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी स्फोटक साहित्य ठेवलेली होती अशी माहिती मिळताच पोलिस अधीक्षक गोंदिया विश्व पानसरे , पोलीस अधीक्षक राजनंदगाव डी. श्रवण आणि अप्पर पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल सेल देवरी आणि राजनांदगाव पोलीस यांनी काहुआभरा जंगलात नक्षल विरोधी अभियान राबविण्यात आले सर्च ऑपरेशन राबवित असतांना जंगल परिसरात संशयास्पद वस्तू आढळून आल्यामुळे राजनांदगाव येथील बी डी डी एस पथकाच्या साहाय्याने खबरदारीच्या उपाययोजना करून पाहणी केली असता नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेली बंदुकीची बॅरल, हँड हेल्ड ग्रॅनाइट आऊटर कव्हर, इलेक्ट्रॉनिक वायर, टेप रोल, स्वीचेस, नक्षल पुस्तके, निळ्या रंगाचा मोठा ड्रम, बॅटरी, सोलर प्लेट, इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई राजनांदगाव पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया, डी श्रवण पोलीस अधीक्षक राजनांदगाव, अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिकारी गोंदिया, यांच्या मार्गदर्शनात पार पडली असून नक्षल सेल देवरी, राजनांदगाव पोलीस, अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Share