दोन खाजगी इसमांना लाच देणे पडले महागात; भंडारा लाचलुचपत विभागाकडून कार्यवाही

भंडारा: लाच देणे आणि लाच स्वीकारणे हे कायद्याने गुन्हा ठरतो. अनेकदा लाच स्वीकारणारेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापड्यात अडकल्याची बहुतांश प्रसार माध्यमात झडकत असतात. मात्र आपले कर्तव्य अतिशय कर्तव्यदक्षतेने करणारे असून देखील कर्तव्यदक्ष कर्मचारी पडद्याआड असतात. त्यांची कुणीच दखल घेत देखील नसतात. अशी एक घटना भंडारा जिल्ह्यातील पोलीस नायक पदावर असलेल्या कर्मचाऱ्याने केले असल्याने केवळ लाच घेणारेच दोषी नसतात तर देणारे देखील लाच लुचपत प्रतिबंधक जाळ्यात अडकतात. याचा प्रत्यय पोलीस नायकाने दाखवून दिले आहे. याचा परिणाम लाखांदूर येथील जनसामान्य जनतेवर आणि पोलीस कर्मचारी किमान लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीमधील नागरिकांवर पडणारे परिणाम आहे.

सविस्तर वृत्त असे की, आरोपी खाजगी इसम १) निवास दशरथ ठाकरे, वय ४२ वर्ष, धंदा शेती तथा ट्रॅक्टर मालक, रा. आथली, तहसील लाखांदूर जिल्हा भंडारा तर नंदकिशोर नामदेव ठाकरे, वय २८ वर्ष, धंदा शेती आणि ट्रॅक्टर मालक रा. आथली या खाजगी इसमांनी आहेत.

तक्रारदार पोलीस नायक पोलीस स्टेशन लाखांदूर येथे नायक या पदावर नेमणुकीस आहे. त्याच्याकडे तपासावर असलेल्या अपराध क्रमांक २८३/२१ कलम ३८९,५०६,३४ या गुन्ह्यात आरोपी यांचे ट्रॅक्टर जप्त असून तो ट्रॅक्टर सोडविण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. यातील फिर्यादी याला न्यायालयाने तो ट्रॅक्टर सुपुर्दनाम्यावर परत करण्याबाबत अभिप्राय विचारला असता तो आरोपी यांच्या बाजूने पाठवावा या करिता तक्रारदार याने त्यांना अनुग्रह दाखवावा म्हणून प्रभाव निर्माण करण्याकरिता ३००० रुपयांची लाच, गैरफायद्याच्या स्वरूपात तक्रारदार याला देऊ केली. ती स्वीकारण्याची इच्छा नसल्याने सापडा रचण्यात आला. त्या सापड्यात लाच दिली. सापळा कार्यवाही करण्यात आली. कलम ८ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राकेश ओला पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांच्या मार्गदर्शनात सदरची कार्यवाही घडून आली.

यावेळी मिलिंद तोतरे अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि नागपूर, सापळा अधिकारी कमलेश विलास सोनटक्के, पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा, कारवाई पथक- महेश दत्तात्रय चाटे, पोलिस उप अधीक्षक, कमलेश विलास सोनटक्के, पोलीस निरीक्षक, कोमल बनकर, अतुल मेश्राम, कुणाल कडव, चनापोशी दिनेश धार्मिक सर्व नेमणूक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा यांनी प्रत्यक्ष कार्यवाही केली.

Share