राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित वरीष्ठ महाविद्यालये 20 ऑक्टोबर पासून होणार सुरु होणार
“गोंदिया जिल्ह्यातील १८ वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांनी कोव्हिड १९ ची प्रतिबंधात्मक लस घेऊनच महाविद्यालयात प्रवेश करावा”- मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे आवाहन
गोंदिया 14: राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग दि. ०४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी हे १८ वर्षांवरील असून बहुतेक विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील कोव्हिड १९ बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली असून सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणाखाली आल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये कोव्हिड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करुन विद्यार्थ्यांकरिता ऑफलाईन पध्दतीने नियमित वर्ग सुरु करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील. सबब, राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार दिनांक २० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये सुरु होतील याबाबदचे परिपत्रक राज्य शासनाने जाहीर केले आहे.